आर्या

आर्या

आर्या च्या नावातच गोडवा होता. लहानपणापासून लोभस अशी आर्या जशी वयात आली तशी अधिकच सुरेख दिसू लागली. तिची उंची, सुडौल बांधा, नितळ कांती आणि हसतांना गालावर पडणारी खळी…. सार काही रेखीव. दहवीत असलेल्या आर्या च्या आणि घरच्यांच्या, विशेषत: आइर्च्या मनात मात्र एक गोष्ट खटकत होती. आर्याला अजून पाळी सुरू झाली नव्हती. या काळजीतच, थोडीशी घाबरलेली आई, आर्याला घेऊन माझ्या क्लिनीकला आली. आई-वडिलांबरोबर आलेली गोड आर्या मला आजही आठवते. किती वर्ष झालेत बरं त्या गोष्टीला… हो जवळपास अकरा वर्ष!

आर्या च्या आईने जेव्हा मला सांगितले की, हिला पाळीच आली नाही तेव्हा मला देखील जरा काळजी वाटली. आर्याला तपासतांना सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु सोनोग्राफी करतांना माझा चेहरा पडला. कारणही तसचं होत. आर्याला गर्भाशयच नव्हत. पुढील चाचण्यांचा भाग म्हणून एक चिठ्ठी मी आर्याच्या वडिलांच्या हाती. दिली ती चाचणी होती क्रोमोसोम्सची. चाचण्यांचे रिपोर्ट हाती आले आणि क्रोमोसोमचा रिपोर्ट होता 46 ग्ल् हो चक्क पुरूषांचे क्रोमसोम्स होते. ते… एन्ड्रोजेन इन्सेनसीटीवीटी सिंड्रोम हे नाव मी 30 वर्षापूवी परीक्षेच्या वेळी वाचल्याचे मला आठवत होते.

परंतु प्रत्यक्ष अशा प्रकारची केस माझ्यासमोर उभी राहील याची कल्पना देखील मी कधी केली नव्हती. या प्रकारात त्या व्यक्तीच्या टेस्टीस म्हणजे पुरूषा ग्रंथी या पोटातच असतात. त्या ग्रंथीनी तयार केलेले हार्मोन्स त्या व्यक्तीवर प्रभाव करीत नाहीत. म्हणजे त्मबमचजवते त्या हार्मोन्सला असंवेदनशील असतात. या ग्रंथीच्या हार्मोन्सचा शरीरावर परिणाम न झाल्यामुळे बाहयत: ही व्यक्ती संपूर्णपणे स्त्रीच असत. परंतु शरीरात गर्भाशय नसत आणि असतात त्या पुरूष ग्रंथी. आता वेळ आली होती या सगळया घडामोडी आर्याला. आणि तिच्या आई वडिलांना समजावून सांगण्याची आणि ते देखील दोन पातळीवर शारीरिक आणि मानसिक.

16 वर्षाच्या मुलीला असं अचानक तुला गर्भाशयच नाही आणि तु मुलगी नसून मुलगा आहेस. हे सांगण म्हणजे किती जिकरीच काम. सगळ समजावून सांगितल्यावर वडिलांनी कपाळाला हात लावला. आई रडायला लागली आणि आर्याचा चेहरा निर्विकार. आता गरज होती स्टे्रट टॉक ची, मी तिला म्हटल आर्या हे अस आहे? पण माझ्या द़ृष्टीती तु एक सुंदर, हुशार व ब्वदपिकमदज मुलगी आहेस. समाजाच्या द़ृष्टीनी तू मुलगी आहेस आणि तुला देखील हे नक्की माहिती आहे.

तुझे क्रोमोसोम्स काय आहेत याच्याशी तुझ्या मनाला आणि शरीराला देखील काय करायचे आहे? तिला ते पटल होतं आणि पहिली लढाई मी जिंकलो होतो. डॉक्टर म्हणून आणिक एक कार्य मला पार पाडायचे होते. तिच्या पोटातील पुरूष बीज ग्रंथी लेप्रोस्कोपीच्या सहाय्याने काढून टाकणे आवश्यक होते. कारण त्या जर पोटातच राहिल्या तर त्याचा कँसर होण्याची शक्यता असते. हे ऑपरेशन देखील व्यवस्थित पार पडले. पुढची दहा वर्ष व्यवस्थित गेलीत. मुळात हुशार असलेली आर्या सिंगापूरला एका फायनान्स कपंनीत नोकरीला लागली. एके दिवशी सकाळीच आर्याचा मेसेज वाचला वॉटस्अ‍ॅपवर डॉ. आय व्हांट टू वॉन्ट टू मिट यू!

ती म्हणाली डॉ. माझ्या आयुष्यात हे वादळ येणार याची मला पूर्ण कल्पना होती. त्याला टाळण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीत होती. ऑफीसमध्ये कामाशी काम ठेवायची. परंतु समर तर पहिल्या दिवसापासून माझ्या प्रेमात पडला होता. आणि मी देखील नकळत त्याच्याकडे ओढली जात होती. त्याची अवस्था ‘‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला’’ अशी झाली होती. काल त्याने मला प्रपोज केलं. अगदी फिल्मी स्टाईल, गुडघ्यांवर बसून.

मी मोहरली, लाजून चूर झाली. परंतु लगेच इतके दिवस मनात दाबून ठेवलेले ते गुपीत मला अस्वस्थ करू लागले. काय करू मी आता कस होकार देऊ त्याला. मी तिच म्हणण ऐकून घेतल आणि तिला एकच प्रश्न केला… आर्या, समर ला माहिती आहे ना की तुला गर्भाशयच नाही? आणि तु आई होऊ शकत नाहीस? त्यावर ती लगेच उत्तरली, गप्पाच्या ओघात मी हे त्याला कधीच सांगितले आहे. आणि तरी देखील तो माझ्यावर प्रेम करतो.

ऐकुन मला हायस वाटलं. म्हटलं ठीक तर आर्या… तुझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायची वेळ आज आली आहे. इतक्या वर्षाचा हा प्रवास तु खंबीरपणे केलास तुझ्यातील स्त्रीत्वाला जपलंस आता काय परिस्थिती बदलली आहे? तू तूच आहेस. मग अडल कुठे? आर्याला माझं म्हणण पटल होत. काही दिवसातच तिच्या लग्नाची पत्रिका माझ्या मेजवर होती आणि माझ्या चेहर्‍यावर स्मित.

AND THEY LIVED HAPPILY EVER AFTER

Complete androgen insensitivity syndrome

ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये शरीरातील पेशी ;तमबमचजवतेद्ध ।दकतवहमद नामक पुरूष हार्मोन ला प्रतिसाद देत नाहीत. ही त्मबमचजवते (आकलन पेशी) ची समस्या आहे. यामध्ये पुरूष ग्रंथी असतात परंतु त्या ग्रंथींचा शरीरावर कुठलाही प्रभाव दिसत नाही. परिणामी बाहयत: पूर्णपणे स्त्रीचं शरीर विकसीत होते. आणि क्रोमोसोम्स असतात ग्ल् अर्थातच पुरूषांचे ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असून लाखात 1 अशा केसेस जगात नोंदविल्या गेलेल्या आहेत.

ही काल्पनिक कथा असून याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही.

डॉ. चैतन्य शेंबेकर