जन्म आईचा

 जन्म आईचा

जन्म आईचा

बाळ जन्माला येण हे स्त्री च्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा क्षण. कारण याच क्षणी एका आईचा जन्म झालेला असतो.

बाळाच रडण ऐकल की प्रसूति करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि जमलेले नातेवाईक सगळेच सुटकेचा निःश्वास टाकतात.

चिंता, भिति, काळजी या भावनांची जागा आनंद, उत्साह, वात्सल्य, समाधान घेतात.

खरोखरीच आयुष्यातील उत्कठ अनुभव देणारा क्षण  . . . . . . याचे शब्दात वर्णन होणे नाही.

डिलेव्हरी झाली की मी गमतीने नविन आई – बाप झालेल्या जोडप्यांना विचारतो — काय कस वाटतय  ? मुलगी तर आनंदात असतेच पण नविन बाळ झालेला मुलगा विशेष उत्साहात असतो. काय फेसबुक आणि व्हॉट अँप वर स्टेटस अपडेट केला की नाही?  मी त्यांना पाठीवर थाप मारत विचारतो. मग मी त्यांना हळूच सांगतो – आता जबाबदाऱ्यादेखील वाढल्यात बर.  आता तुम्ही मोठे झालात.

आणि खरच मातृत्वाची जबाबदारी ही विशेष असते.  त्याची सुरूवातच होते बाळाला दूध पाजण्यापासून. ९ महीन्यापासून जरी त्याची तयारी सुरू असली तरी प्रत्यक्षात बाळाला दूध पाजायची वेळ आली की टेंशन तर येतच. त्याचबरोबर सुरू होत रात्रीच जागणं, बाळाची शी सू करता करता थकायला होत आणि या सर्व गोष्टींचा परिणाम मनावर होतो. त्याला  मँटर्नीटी ब्लूज असे म्हणतात. हेच नैराश्य वाढल्यास पोस्ट पार्टम सायकोसीस देखील होऊ शकत.  परंतु सहसा अस घडत नाही. आपल्याकडची भक्कम कुटूंब व्यवस्था, आई आणि सासूनी घेतलेली काळजी अशा वेळी कामी येते.

तर थोडक्यात सांगायच म्हणजे आईचा जन्म हा स्री च्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा टप्पा असतो. आणि आयुष्यभर हे मातृत्व स्री आनंदाने स्विकारते. बाळाची काळजी जशी नुकत्याच आई झालेल्या मूलीला असते तीच काळजी तिला शेवटपर्यंत असते.

अगदी ९२ वर्षाची माझी आजी देखील शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मूलांची, सुनांची आणि नातवंडाची देखील काळजी करतांना,  त्यांना प्रेम देतांना मी अनुभवल आहे.

गेल्या काही वर्षात समाजात मातृत्व या विषयांशी संबंधीत बदल मी अनुभवतो आहे.

मातृत्व स्विकारतांना ते अगदी मनापासून आणि आनंदाने स्विकाराव. परंतु आजकाल माझ आयुष्य,  माझ करियर,  माझे स्वातंत्र्य असले विचार करणाऱ्या स्रीया मातृत्व हे देखील करीयर आहे. हे विसरत चालल्या आहेत.

वय २५ ते ३० हा आयुष्यातील उभारीचा, तारूण्याचा आणि उत्साहाचा काळ मातृत्वासाठी राखून ठेवायला हवा. आधी करीयर आणि मग मूलबाळ हा अतिशय चुकीचा विचार रूढ होत चालला आहे.  त्यावर विचार हा व्हायलाच हवा.

हल्ली काही जोडपी – अगदी बोटावर मोजण्याइतकी  – अशी ही असतात की ज्यांनी आपल्या आयुष्यात अडथळा नको. म्हणून मूलबाळ नकोच असा विचार पक्का केला असतो. ही मंडळी ध्येयवेडी असतात.  शंभर वर्षापूर्वी रघुनाथ कर्वे यांनी भारतातील पहिल कुटूंब नियोजन केंद्र सुरू केल. आणि त्यासाठी आपल  आयुष्य झोकून दिल. कुटूंब नियोजनाच महत्व पटाव याकरिता त्यांनी स्वतःला मूलबाळ होऊ दिल नाही. माझ्या माहितीतलएक जोडप आहे.  जे ट्रँव्हल जर्नेलीझम करतात. दोघही आपल्या कामात व्यस्त आणि समाधानी असल्यामूळे मूलबाळ होऊ न देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.  परंतू अशी जोडपी कमीच असतात.

जास्तीत जास्त जोडप्यांना मूल तर हव असत पण सध्या नको असा त्यांचा सूर असतो आणि नेमक इथच आपल चूकत.  प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. आईचा जन्म होण्याची देखील योग्य वेळ आहे हे आपण विसरून जातो. आणि मग याच कारणानी,  नेमक याच कारणानी व्यंध्यत्त्वाच प्रमाण किती वाढत आहे याची आजच्या पिढीला कल्पनाच नाही.

मनुष्य स्वभाव किती विचित्र असतो नाही. जी गोष्ट आपल्याला सहज मिळते त्याच महत्व नसत आणि जी मिळत नाही त्यासाठी जीव वेडापीसा होतो. मूलबाळ होण आणि न होण याबाबतीतही नेमक असच घडत.

मी आई कधी होणार या प्रश्नाभोवती स्रीच संपूर्ण आयष्य फिरत असत आणि त्याच कारणांनी ती आयुष्यात कुठलीच गोष्ट धड करू शकत नाही.

सुप्रजनन हा निसर्गाचा नियम आहे. मातृत्वाचा अनुभव आई झाल्यावरच कळतो आणि मूलबाळ नसण्याच दू:ख ज्याच्या नशिबी येत तेच जाणू शकतात.

खरोखरच आईचा जन्म प्रत्येक स्री करीता किती महत्वाचा असतो नाही ?


डॉ
. चैतन्य शेंबेकर
चेअरमेन अँड मॅनेजिंग डायरेक्टर
ओमेगा हॉस्पिटल, नागपूर