तू अभी तक है हसी और मै जवाँ…..

मेल मोनोपौज़

मेल मोनोपौज़

मेल मोनोपौज़ हा एक अवस्था आहे ज्यामुळे पुरुषांच्या शरीरात हार्मोन आणि तत्त्वांच्या स्तरात बदल होते. जसे की त्यांच्या टेस्टोस्टेरोन (पुरुष हार्मोन) च्या स्तरात कमी होते. कोरोना चा प्रभाव मानसिक स्वास्थावर देखील होतो आहे. या काळात विशेषतः अँड्रोपॉज च्या वयोगटातील पुरुषांनी  काळजी घ्यायला हवी. आज अर्चनाचा ४९ वा वाढदिवस. हेमंत आणि रिटा नी १२ च्या ठोक्याला तिला विश केल. पण… हेमंत आज दरवर्षी प्रमाणे बुके आणायला विसरला होता. आणि म्हणतो कसा काय काकुबाई पन्नाशी आली आता!

अर्चनाचा मूडच गेला. माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठा असून हा काय स्वत:ला सलमान खान समजतो? आणि मला मेनोपॉज आला म्हणजे मी काय काकूबाई झाली?

तिने लगेच निताला व्हॉटसअप केला. हेमंत अर्चनाची घनिष्ठ मैत्रीण असलेली निता गायनीकोलॉजिस्ट होती. आणि हेमंत तीच ऐकतो हे अर्चनाला माहिती होत.

कॉफीचा सीप घेत निताने थेट प्रश्न केला – हेमंत तु कुठेतरी चुकतो आहेस. तुझ्या अटीटयूड? अरे तुला माहित आहे का? पुरूषांना देखील मेनोपॉज येतो. त्याला अँड्रोपॉज (मेल मोनोपौज़) म्हणतात. गमतीने मी त्याला मॅनओपॉज म्हणते.

आम्हा स्त्रियांची पाळी थांबली की आम्ही म्हातारे झालो. आणि तुम्ही चिरतरूण राहणार अस नाही आहे.

हेमंतचा चेहरा उतरला. आपली चूक त्याच्या लक्षात आली होती.

तिशीनंतर पुरूषांमधले हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉनची पातळी दरवर्षी १० टक्क्यांनी कमी होत असते.

फरक एवढाच की पुरूषांना याचा त्रास उशीरा म्हणजे पन्नाशीनंतर आणि हळूहळू सुरू होतो. म्हणजेच हेमंत सध्या तुला जरी अस जाणवत नसल तरी अर्चनाला गेल्या ५ वर्षात जसा त्रास झाला. काहीसा तसलाच त्रास तुला पुढील ५ वर्षात सुरू होणार हे तू जाणून घे.

आता हेमंत लक्षपूर्वक ऐकू लागला. डॉ. निता सांगू लागली – सर्वात महत्वाचा बदल म्हणजे लवकर थकवा येणे. आज तू उच्च पदावर पोहोचला आहेस. अशा वेळी मोठे निर्णय घेतांना काळजी वाढते. चाळीशीतील पुरूष कसे असतात. Fearless पन्नाशीत त्यांची आव्हान पेलण्याची क्षमता कमी होते. आणि येत नैराश्य. त्याचबरोबर शरीरातील सर्वात मोठा बदल जो या काळात होत असतो. आणि तो पुरूषांसाठी सर्वाधिक त्रासदायक असतो तो आहे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा न होणे. अर्थातच सेक्स ड्राईव्ह कमी होणे. आणि हे त्यांच्या पुरूषार्थालाच आव्हान ठरत ज्यामुळे येणार नैराश्य बऱ्याच पुरूषांना सहन होत नाही.

आम्ही स्त्रिया बऱ्या, सगळयाच गोष्टींना सहजपणे अँडजेस्ट होतो. तुमचं तस नसत रे हेमंत! आज हेमंतची खैर नव्हती, तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करीत होता बिचारा. आणि हो, या नेराश्याबरोबर चिडचिड आणि मूड स्वींग्ज येणारच. तू कितीही जीम केली तरी मसलची स्ट्रेंथ कमी होणार. पण तू जीम मध्ये जाणं सोडू नकोस. आणि अर्चना तू देखील नियमित व्यायाम सुरू ठेव. त्याचबरोबर शारीरिक बदलही दिसायला लागतात. पोट बाहेर येत, खांदे वाकतात, टक्कल तर तुला पडायला लागलच आहे. आता त्या पोटावर नियंत्रण ठेव. ऑफीसच्या कॉकटेल पार्ट्या जरा कमी करा आता!

हेमंतनी शहाण्या मूलासारखी मान डोलावली. याचबरोबर खूप जास्त घाम येण, शरीराद्वारे गरम वाफा जाण असले प्रकार देखील अँड्रोपॉजमुळे होतात. पण या वयात सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे ती हृदयाची आणि हाडांची. याकडे लक्ष दिलस तर पुढले तीस वर्ष तुला काळजी नसावी. कारण अँड्रोपॉजची इतर लक्षण तर जातील तू त्यांना अँडजेस्ट होशील पण लक्षात ठेव. नियमित तपासण्या, योग्य आहार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री तुझ्या आयुष्याचा दुसरा अंक अधिकच रंगवणार बघ.

निताने कॉफीचा कप खाली ठेवला. निघते मी. एन्जॉय यूर डे अर्चना, बाय हेमंत.

अर्चनानी निताचा हात घट्ट दाबला. तिच काम झालं होत.

आणि रात्री कॅंडल लाईट डीनर, अर्चनाच्या आवडीची व्हाईट वाईन, लाईट म्युझीक आणि गुलाबाचा सुंदर बुके. अर्चनाच्या वाढदिवसाचा शेवट गोड झाला होता.

एक तप कस ओलांडल कळलच नाही. हेमंत नी त्या सर्व गोष्टी अनुभवल्या ज्या नितानी सांगितल्या होत्या. पण त्याला औषधांची गरजच भासली नाही. औषधांची गरज नसतेच मुळी या सर्व गोष्टींना.

आज हेमंतची एकसष्ठी गाण्याचा कार्यक्रम रंगला होता. हेमंत सर्व काही विसरून अर्चनाच्या नजरेत नजर मिळवून गात होता.

ए मेरी जोहरजबी

तुझे मालूम नही

तू अभीतक हे हसी

और मै जवाँ

तुझपे कुरबान मेरी जान मेरी जान!

आणि अर्चना चक्क लाजली!

डॉचैतन्य शेंबेकर
चेअरमेन अँड मॅनेजिंग डायरेक्टर
ओमेगा हॉस्पिटल, नागपूर